अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत महिलांनी हजारोच्या संख्यने सहभागी होण्याचा निर्धार, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांच्या बैठकीत करण्यात आला.जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मोहीम गत १३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. दर शनिवारी लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शहरातील महिला लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक हर्षदा काकड, मनपा सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या भारती खंडेलवाल, माजी महापौर सुमन गावंडे, नगरसेविका गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल, सुजाता अहीर, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.वारे, अरुंधती शिरसाट, ज्योती मलीये, शामला खोत, धनश्री गाडे यांच्यासह विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी, विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या. १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाºया मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महिलांच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजितसिंह बछेर, प्रशांत राठी उपस्थित होते. बैठकीचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले.मोर्णा स्वच्छतेसाठी ‘मातृशक्ती’ने एकजूट व्हावे - जिल्हाधिकारी१० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाºया मोर्णा स्वच्छता मोहिमेसाठी मातृशक्तीने एकजूट होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी यावेळी केले. शहरातील गृहिणी, महिला अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, नगरसेविका, अंगणवाडीसेविका, परिचारिका, अधिकारी-कर्मचाºयांच्या पत्नी यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.