ब्रम्हानंद जाधव/ मेहकर (जि. बुलडाणा) : गत दीड महिन्यापासून पावसाच्या अनियमिततेने पांढरं सोनं समजले जाणारे कापसाचे पीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी राज्यभरातील जवळपास ४0 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कपाशीची वाढ खुंटली आहे. मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर बहुतांश शेतकर्यांनी कापसाची लागवड केली. राज्यभरात सुमारे ४0 लाख हेक्टरपेक्षा जास्त, तर विदर्भात सुमारे १५ ते १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्रोत घटले आहेत. परिणामी कपाशीने माना टाकल्या आहेत.
*हंड्याने पाणी!
कपाशीची छोटी रोपटे वाचविण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. कोवळ्य़ा रोपट्यांना हंड्याने पाणी दिले जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.