अकोला: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी यश आले आहे. तुषार पुंडकर यांची हत्या राजकीय हेतूने प्रेरित नव्हेतर जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुंडकर हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर पवन सेदाणी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना गुरूवारी अटक केली आहे.अकोट शहर पोलीस स्टेशनलगच्या पोलीस वसाहतीमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात आरोपींनी देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून त्यांची २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. मारेकºयांनी नियोजनपूर्वक हत्या करण्याचा कट रचला होता, हे घटनेतून दिसून येते. गोळीबार केल्यावर तुषार पुंडकर कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहता कामा नये, याच हेतूने मारेकºयांनी त्यांच्यावर पाठीमागून डोक्यात, छातीत आणि त्यांच्या पार्श्वभागावर गोळीबार केला होता. या हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. मारेकºयांच्या शोधासाठी पोलिसांचे सहा पथके कामाला लागले होते. सर्वच प्रकारे तपास करून आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या हत्याकांडाच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या चमूने घेत, महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणात अकोट येथील आरोपी पवन नंदकिशोर सेदाणी, श्याम उर्फ स्वप्नील पुरूषोत्तम नाठे आणि अल्पेश भगवान दुधे यांना अटक करून तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळविले. पुंडकर यांच्या हत्येनंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. राजकीय, खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा कयास लावल्या जात होता. त्यामुळे पोलिसांनी सर्वच दृष्टीकोनातून तपास करीत, अकोटमधील अनेक संशयितांची उलट तपासणी केली. परंतु या तपासणीतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी हत्याकांडाची सूत्रे हाती घेत, गतीने तपासाची चक्रे फिरविली आणि आरोपींना गजाआड करण्यात मोलाची भुमिका बजावली. (प्रतिनिधी)
सूड घेण्यासाठी पुंडकर यांची हत्या!प्रहार जनशक्ती पक्षाची माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या वादातून ११ सप्टेंबर २0१३ रोजी सरस्वती नगरातील पवन सेदाणी याचा चुलत भाऊ तेजस सुरेश सेदाणी याची धारदार शस्त्र व लोखंडी पाइपने मारहाण करून निर्घुण हत्या केली होती. या हत्येचा सूड घेण्यासाठीच आरोपी पवन सेदाणी याने तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचला आणि श्याम नाठे, अल्पेश दुधे या सहकाऱ्यांच्या मदतीने पुंडकर यांच्यावर देशीकट्ट्यातून गोळीबार करून त्यांची निर्घुण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
गणेशोत्सव मंडळामुळे उद्भवला होता वादमृतक तेजस सेदाणी याने काही युवकांसह शिवाजी कॉलेज रोडवर नवीन गणेश मंडळाची स्थापना केली होती. परिसरात एकच गणेशोत्सव मंडळ असावे. अशी पुंडकर यांची अपेक्षा होती. या गणेशोत्सव मंडळालातुषार पुंडकर यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी व सहकाºयांनी तेजसची हत्या केल्याचा आरोप तेजसचे वडील सुरेश सेदाणी यांनी त्यावेळी पोलीस तक्रारीत केला होता.