अकाेला : आकाेट चाेहाेट्टा बाजार राेडवर गांधीग्राम येथील रहिवासी ऋषिकेश उर्फ चिंटू अशाेक सदांशिव या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. चिंटू त्याच्या बहिणीला सासरी साेडून परत येत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला हाेता. ताे जखमी असताना ट्रॅक्टरचालक व त्याच्यासाेबत असलेल्यांनी काहीही मदत न करता त्याचा माेबाइल पळवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हाेता.
ऋषिकेश उर्फ चिंटू अशाेक सदांशिव हा २७ मे २०२० राेजी त्याच्या बहिणीला शिरसाेली येथे साेडल्यानंतर दुचाकीने (क्र. एमएच ३० एजे ८२६३) परत येत असताना त्याला ट्रॅक्टरने (क्र. एमएच ३० इ ३९४७) जबर धडक दिली. यामध्ये ताे गंभीर जखमी झालेला असतानाही ट्रॅक्टरचालक पवन प्रमाेद डांगे, रा. दनाेरी, गणेश उर्फ मनीष सुभाष तळी, रा. पाताेंडा व कुंदन शिरखरे या तिघांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ऋषिकेश याच्या खिशातून माेबाइल व कागदपत्र गायब केले. या प्रकरणाची तक्रार राेशन सदांशिव यांनी दहीहांडा पाेलीस ठाण्यात केल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर ऋषिकेशच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनाचा शाेध सुरू केला असता ते वाहन संजय हरिभाऊ बुध यांच्या मालकीचे असल्याचे समाेर आले. यावरून त्या दिवशी ट्रॅक्टरवर असलेले पवन डांगे व गणेश तळी यांनीच हा अपघात केल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शुक्रवारी अटक केली. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर डाबेराव, संदीप काटकर, लीलाधर खंडारे, रवि पालीवार, विशाल माेरे, संदीप तवाडे, अनील राठाेड, गाेपाल ठाेंबरे, गणेश साेनाेने यांनी केली.