अकोट , दि. ६- अकोट नगर परिषद अंतर्गत कर विभागाकडून मालमत्तेच्या थकीत कर वसुलीकरिता मालमत्ता जप्तीची मोहीम राबविली जात आहे. यामध्ये ६ मार्च रोजी तीन मालमत्ता जप्त करून सील लावण्यात आले आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे पालिकेची कर देयके थकीत आहेत. त्याकरिता नगर परिषदेने विशेष मोहीम राबविणे सुरू केले आहे. या मोहिमेत कर न भरणार्या इरफान अहेमद देशमुख यांची दोन दुकाने तसेच विठ्ठल पांडुरंग गेबड यांच्या घराला सील लाऊन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी तीन दिवसात कराचा भरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी सांगितले आहेत. या मोहिमेमध्ये कर अधीक्षक गौरव लोंदे, कार्यालय पर्यवेक्षक मयूरी जोशी, कर विभागातील सुभाष घटाळे, शरद तेलगोटे, विजय सारवान व कर वसुली पथकातील कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
तीन मालमत्तांना सील
By admin | Published: March 07, 2017 2:26 AM