वाडेगाव : स्थानिक पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या दोन दुचाकी, तर चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी अशा एकूण तीन दुचाकी चोरीला गेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा येथून गुरुवारी दुचाकी (क्र. एमएच ३० एएच ६५२६) चोरीला गेली, तर मोहसीन (रा. वाडेगाव) यांच्या मालकीची दुसरी दुचाकी (क्र. एमएच ३० एडब्लू ५४८९) चोरीला गेली. ही दुचाकी शेतात धुऱ्यावर ठेवली होती. चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत दिग्रस बु. शेतशिवारातून दिग्रस येथील शिक्षक डिगांबर बराटे यांची दुचाकी (क्र. एमएच ३० एजी ५४०५) तीन दिवसांपूर्वी शेताच्या बंधावरून चोरीला गेली.
-----------------------------------------
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाडेगाव व दिग्रस बु. शेतशिवारात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेमुळे शेतकरी शेतात दुचाकी घेऊन जाण्यास घाबरत आहेत. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.