सदनामध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेला जिल्हा कोषागार अधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी व तसेच जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हा कोषागार अधिकारी एम. बी. गोरेगावकर तसेच लेखा लिपिक वि. म. मानकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणांतर्गत सभासद नोंदणीस विलंब, नॉन आयएसआय प्राण, निरंक जमा प्राण, नामनिर्देशन नसलेले प्राण, मोबाइल क्रमांक नसलेले प्राण, बँक तपशील नसलेले प्राण, आहरण व संवितरण अधिकारी यांचा तपशील, अंशता रक्कम काढणे, प्रलंबित प्रकरणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून बाहेर पडणे, नियत वयोमान सेवानिवृत्ती प्रकरणात दावा, क्रमांक प्राप्त परंतु प्रत्यक्ष कार्यवाही नाही, नियत वयोमर्यादा सेवानिवृत्ती प्रकरणात सेवानिवृत्तीनंतर प्रकरण सादर न करणे, मंजूर ऑनलाइन प्रकरणात कागदपत्रे सादर नसलेली प्रकरणे, नियत सेवानिवृत्तीमधील विलंब झालेली प्रकरणे, नोंदणीकृत सभासद संख्या आणि वर्गणी कपात होणारे सभासद यामधील फरक वर्गणी पाठवण्यात होणारा विलंब ट्रस्टी बँकेकडून रक्कम परत येणे एनएसडीएल डॅशबोर्डवरील लॉगिन मॉडेल याबाबत प्रशिक्षण सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय निवृत्ती वेतनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:16 AM