अकोला : विदर्भात येत्या तीन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. अकोला जिल्ह्यावरही ढगाळ वातावरण होते.यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच विदर्भात अवकाळी पाऊस पडतो आहे. या पावसामुळे खरीप पिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा पिकावर मोठा परिणाम झाला असून, अनेक भागात संत्रा, लिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस उसंत देत नसून, आठवड्यातून एक-दोन दिवस पडतच आहे. दरम्यान, १३ ते १५ एप्रिलपर्यंत पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
विदर्भात तीन दिवस पावसाचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 6:25 PM