अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ९ मार्च रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरानाबळींचा आकडा ३८९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ९४ अशा एकूण २६७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,५०० वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ३०, मूर्तिजापूर येथील २१, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जुने शहर, न्यू तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, काँग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलीस क्वॉर्टर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी दोन, तर रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गीता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यू खेतान नगर, वाडेगाव, देशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यू राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हीएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.एक
एक महिला व दोन पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या सांगवी बाजार ता. अकोला येथील ६५ वर्षीय महिला व शास्त्री नगर, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे ३ व १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी हिवरखेड, ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
२३३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील ११, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० अशा एकूण २३३ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,७६९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,५०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,७६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.