ठळक मुद्देचतारीसह खेट्री, सायवणी, चान्नी ग्रामस्थांमध्येही दहशतीचे वातावरणमंगळवारी आणखी एक आढळले मृत हरीण
लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वन विभागांतर्गत येत असलेल्या चतारी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. परिसरात वावर असलेल्या या बिबट्याने २५ डिसेंबरच्या रात्री तीन हरिणांना ठार केल्याचे आढळून आल्याने, शेतकरी भयभीत झाले आहेत.चतारी येथील शेतकरी दशरथ हिरळकार यांच्या शेताच्या बांधावर २६ डिसेंबर रोजी सकाळी तीन वाजताच्या सुमारास परत एक मृत हरीण आढळून आले. चतारीसह परिसरातील खेट्री, सायवणी, चान्नी या गावांलगत बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे ग्रामस्थांना व पाळीव प्राण्यांना धोका निर्माणा झाला आहे. वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.