पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा कौल स्वीकारून चरणगावचे तीनही गटांनी एकत्र येत गावविकासाठी नवा आदर्श घालून दिला आहे. उपसरपंच वैशाली दीपक इंगळे यांच्या पदभाराच्या दिवशी तिन्ही गटांनी एकत्रित येत गाव विकासाची शपथ घेतली.
पातूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मित्र, काका-पुतणे, भाऊ- चुलत भाऊ तथा नात्यागोत्यातील अनेक सहकारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले. कुठे कोणाचा पराभव झाला तर कुठे कुणाला यश प्राप्त झालं, असे असले तरी पातूर तालुक्यातील मात्र चरणगावच्या ग्रामपंचायतमध्ये गावकऱ्यांनी तीन गटांना कौल दिला. यात प्रामुख्याने जि. प. सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती प्रमोद ऊर्फ पप्पू देशमुख आणि मुरलीधर क्षीरसागर, संताेष इंगळे, बाळकृष्ण वसतकार यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलची निवडणुकीत त्रिशंकू स्थिती चरणगाव येथे निर्माण झाली होती. सरपंच पदाची निवडणूक ही एकमेकाविरुद्ध लढली.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासासाठी एकत्रित येणारे गाव म्हणून चरणगावची विशेष ओळख आहे, हीच ओळख कायम ठेवण्यासाठी उपसरपंच पदाचा पदभार घेण्यासाठी वैशाली दीपक इंगळे यांनी पुढाकार घेतला. मुरलीधर क्षीरसागर, धनंजय देशमुख, सुमित्रा बाळकृष्ण वसतकार, पूजा धनंजय गाडेकर, मेघा प्रमोद देशमुख, अरुणा गजानन देशमुख, उत्तम विठ्ठल इंगळे, राजेश देविदास शिरसागर यांनी उपसरपंच वैशाली इंगळे यांना विकासासाठी बळ दिले. पदभाराचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाळकृष्ण वसतकार, संतोष शंकर इंगळे, दीपक इंगळे, प्रज्योत इंगळे, विलास इंगळे, सुनील इंगळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पोरे, परसराम सुलताने, भास्कर सुलताने, विनोद नानाराव देशमुख, निलेश रामकृष्ण देशमुख, शैलेश देशमुख, राजेश देशमुख, निलेश विश्वनाथ इंगळे, राजेंद्र इंगळे, रेखाताई शिरसागर, भाविका रमेश शिंदे, अक्षय शिरसाट, ग्रामसेवक अशोक देवकते, तलाठी सुरेश घाटे यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन श्रीकृष्ण इंगळे यांनी केले.
.....................
गावकऱ्यांना केले आवाहन
राजकीय मतभेद विसरून पुढील निवडणुका येईपर्यंत गाव विकासासाठी एकत्रित यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख व मुरलीधर शिरसागर या तीनही गटाच्या प्रमुखांनी गावकऱ्यांना केले.