मूर्तिजापूर (जि. अकोला): येथील एका इसमास ८ ऑगस्ट रोजी घरात गांजाची विक्री करीत असताना तहसीलदार शासकीय पंचांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर पोलिसांनी धाड टाकून त्याच्याजवळून तीन किलो २00 ग्राम गांजा व रोख रक्कम असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक वडरपुरा भागातील साई मंदिर परिसरात राहणारा सहदेव कोंडुजी तायडे (६0) हा इसम घरात साठा बाळगून गांजाची विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून तहसीलदार, शासकीय पंच व मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक पडघान, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड, हेड कॉन्स्टेबल मोहोड, एनपीसी अय्यंज, संतोष गवई, धम्मदीप गवई, भारसाकळे, राजू जाधव, हंबर्डे, वाहनचालक दीपकवार यांनी धाड मारली. या धाडीत आरोपीकडून ३२ हजार ३00 रुपये किमतीचा तीन किलो २३0 ग्रॅम गांजा व गांजा विक्रीची रोख रक्कम ४३ हजार ६५0 रुपये असा एकुण ७५ हजार ९५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर इसमाविरुद्ध एनडीपीएस अँक्टच्या २0, २0 ब (२) ब कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.
तीन किलो गांजा पकडला!
By admin | Published: August 09, 2016 2:29 AM