पहिल्या घटनेत अंदुरा-आडसूळ मार्गावर कापसाने भरलेले मालवाहू जात असताना खड्ड्यांमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू उलटला. या अपघातात तीन जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ग्राम हाता येथून कापूस घेऊन जाणारा मिनीडोअर क्रमांक एमएच ०४, जीसी ९४२० क्रमांकाचे वाहन उलटले. तळेगाव-बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून शेगावकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८, एव्ही ३२८८ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रल्हाद अडकणे रा. दसरा नगर, शेगाव (६०) हे तर मालवाहूवरील दोण जण जागीच ठार झाले आहेत. दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गावर अकोलाहून मूर्तिजापूरकडे जाणारा कन्टेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. या वाहनाची ट्रॉली उलटली. रस्त्यावर ट्रॉली उलटल्यामुळे मूर्तिजापूरकडे जाणारी कार क्रमांक एम.एच.३० ए झेड ३९४६ व अकोल्याकडे येणारा ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.२२१६ यांची समोरासमोर धडक झाली. या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारमधील एक जण गंभीर जखमी झाला, तर तिसऱ्या घटनेत पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तीन अपघातात तीन ठार,१० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:52 AM