अकोला/बुलडाणा/वाशिम, दि. २३ : पश्चिम वर्हाडात ठिकठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातांत तीन जण ठार झाले. या घटना अक ोला, बुलडाणा तथा वाशिम जिल्ह्यांत शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी घडल्या. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. कवठा येथील शेतशिवारात मोहन हरिभाऊ कुरवाळे (२५) हा शेतमजूर काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये तो जागीच ठार झाला. एक वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मूळचा कोलद ता. संग्रामपूर जि. बुलडाणा येथील रहिवासी असलेले कुरवाळे कुटुंब गावाकडे शेती पिकत नसल्यामुळे रोजगारासाठी कवठा येथील वसंतराव चव्हाण यांच्या शेतावर काम करण्यासाठी वास्तव्यास आले होते. दुसर्या घटनेत बुलडाणा जिल्ह्यातील मेंढपाळाचा मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील इसालवाडी येथील वामन रोडुबा येळे हा मेंढपाळ रामगाव शिवारातील जंगलात मेंढय़ा चारत असताना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे मेंढपाळ घराकडे येत असताना अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तिसर्या घटनेत वाशिम तालुक्यातील कोकलगाव येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास वीज कोसळून संजय अभिमान अंभोरे (४0) या शेतकर्याचा मृत्यू झाला.
वीज कोसळून तीन ठार
By admin | Published: September 24, 2016 3:19 AM