लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोठारी वाटिका क्रमांक सहामधील एका उपवर मुलीशी संतोष नगर खडकी येथील एका उपवर मुलाचे साक्षगंध आटोपल्यानंतर मुलीच्या वडिलांना तब्बल तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याप्रकरणी उपवर मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून ही कारवाई केली.मलकापूर रोडवरील कोठारी वाटिका क्रमांक ६ मधील रहिवासी दिलीप विष्णुपंत पुसदकर यांच्या मुलीचे साक्षगंध संतोष नगरातील रहिवासी पवन पुरुषोत्तम पिंजरकर यांच्याशी झाले होते. साक्षगंध आटोपल्यानंतर विवाहाची पुढील प्रक्रिया सुरू असतानाच उपवर मुलाकडून तीन लाख रुपयांचा हुंडा मागण्यात आला. हा प्रकार मुलीच्या वडिलांना पटला नाही, त्यामुळे त्यांनी मध्यस्थामार्फत हे प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही पैशाची मागणी झाल्याने उपवर मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर साक्षगंध आटोपल्यानंतर या मुलाने तीन लाख रुपये हुंडा मागितल्याचे समोर आले, यावरून पोलिसांनी पवन पिंजरकर व आणखी तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपवर मुलाने हुंडा न दिल्यास लग्न मोडण्याची धमकीही मुलीच्या वडिलांना दिली होती, असे तक्रारीत नमूद आहे.-
साक्षगंधानंतर मागितला तीन लाखांचा ‘हुंडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:09 AM
कोठारी वाटिका क्रमांक सहामधील एका उपवर मुलीशी संतोष नगर खडकी येथील एका उपवर मुलाचे साक्षगंध आटोपल्यानंतर मुलीच्या वडिलांना तब्बल तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याप्रकरणी उपवर मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हाविवाह अडचणीत