अकोला, दि. २0- रस्ते अपघातात एका विद्यार्थिनीस जखमी करणार्याविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यानंतर अपघातातील दोषीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. हरणे यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच जखमी विद्यार्थिनीस १0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असून नुकसान भरपाई न दिल्यास आणखी दोन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली.द्वारका नगरातील रहिवासी धनश्री जयकुमार ठोस ही १८ जानेवारी २0१२ रोजी सकाळी ११ वाजता एम एच ३0 क्यू ५८९0 क्रमांकाची दुचाकी घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना चंदन रामचंद्र खोब्रागडे याने एम एच ३0 झेड ६३१९ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने धनश्रीच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. या अपघातात धनश्री जखमी झाल्यानंतर तसेच दुचाकीचे नुकसान झाल्याने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चंदन खोब्रागडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३३७ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले; मात्र तीन साक्षीदार फितूर झाले. त्यानंतरही समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने चंदन खोब्रागडे यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.
अपघातातील दोषीस तीन महिन्यांची शिक्षा
By admin | Published: March 21, 2017 2:23 AM