शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील सात, जीएमसी आणि अकोट येथील पाच, तारफैल, शिवनी, बोरगाव मंजू, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, वाठुळकर लेआऊट, रणपिसेनगर, मोरगाव भाकरे, गीता नगर, अंत्री, मोठी उमरी व खदान येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, वानखडे नगर, आळशी प्लॉट, मलकापूर, आनंदनगर, खडकी, बार्शीटाकळी, सांगळूद, बाभुळगाव, न्यू भीमनगर, नवरंग सोसायटी, डीएसपी ऑफिस, दुधलम व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तसेच अनिकट, रामी हेरीटेज, केशवनगर, चिखली रोड, उगवा, न्यू खेतान नगर, माझोड, मुंडगाव, देशमुख फैल, पंचगव्हाण, निंबी मालोकार, पुनोती, वरोडी, शिवर, दहिगाव गावंडे, साईनगर, केडिया प्लॉट, जठारपेठ, माता नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, बाळापूर नाका, सावरगाव, जुना आंदुरा, महाकाली नगर, भवानी नगर, पिंजर, जवाहर नगर, डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी, सुकळी, तेल्हारा, धरसोडी, बलवंत कॉलनी, न्यू खेतान नगर, जुने शहर, अडगाव, हसनापूर ता. बाळापूर, महसूल कॉलनी, जिल्हा स्त्री रुग्णालय क्वाॅर्टर, केळकर हॉस्पिटल, पिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी बार्शीटाकळी व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मलकापूर, जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी चार, पातूर, सावरखेड, खडकी, शिवनी, गीतानगर, जठारपेठ, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, टेलिफोन कॉलनी, गजाननगर, रतनलाल प्लॉट, केशवनगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड, म्हैसांग, बोरगाव मंजू, मुर्तिजापूर, सस्ती, रामदासपेठ, पिंपळखुटा आणि दगडपारवा येथील प्रत्येकी दोन तर शास्त्री नगर, अकोट, भंडारज, खानापूर, चांदूर, काँग्रेस नगर, वनोजा, बाळापूर, न्यू तापडिया नगर, जुने शहर, शिरसोली, कोठारी वाटिका, लहरिया नगर, रणपिसे नगर, दुर्गाचौक, एसडीओ ऑफिस, जागृती विद्यालय जवळ, आपातापा, कान्हेरी, महागाव, डोनद बु., खरप, गोकुळ कॉलनी, शेलू हातोला, आंबेडकर नगर, आदर्श कॉलनी, संतोष नगर, पंचगव्हाण, जीएमसी, लाखनवाडा, रामनगर. रजपूतपुरा, तारफैल, राऊतवाडी, जुने आरटीओ ऑफिस, दगडी पूल, तोष्णिवाल ले-आऊट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णास २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोट येथील ४९ वर्षीय रुग्ण व गंगानगर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या दोघांना अनुक्रमे २० व २५................. रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
५४७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, होम आयसोलेशनमधील ४००, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील १२, सूर्यचंदर............ हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथील आठ, युनिक हॉस्पिटल येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथील तीन, अवघाते हॉस्पिटल येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील नऊ, समाजकल्याण वसतिगृह येथील १२, स्कायलार्क हॉटेल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, देवसर हॉस्पिटल येथील एक तर आरकेटी हॉस्पिटल येथील सहा अशा एकूण ५४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,९६५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,१०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १८,७१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,९६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.