शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

आणखी तिघांचा मृत्यू, ३७६ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:12 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३१० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा व पारस येथील प्रत्येकी ११, पळसखेड व मलकापूर येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सहा, गोरक्षण रोड, शिवर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी, डाबकी रोड, कुंभारी, एमआयडीसी व गोकूल कॉलनी येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, दानापूर, जीएमसी, अकोट, येवता, लहान उमरी, मोठी उमरी व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, गाडगे प्लॉट, हरिहर पेठ, शास्त्री नगर, नवरंग सोसायटी, गीता नगर, वाशिम बायपास, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, पातूर, सिंधी कॅम्प, बाळापूर व व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी दोन, मडकेवाडी, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, देशपांडे प्लॉट, आयकॉन हॉस्पिटलजवळ, गणपती गल्ली, खरप, मुर्तिजापूर, वरखेड, खिरपूर बु., टाकळी, ताजनगर, इंद्रायणी कॉलनी, हिंगणा, आरटीओ रोड, श्रद्धा नगर, रामदासपेठ, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, आदर्श कॉलनी, जुने शहर, स्नेहा नगर, खोलेश्वर, माणिक टाँकीज, बोरगाव मंजू, बाबुळगाव जहाँगीर, वाजेगाव, नया अंदुरा, अमंतपूर, विझोरा, गुडधी, बिर्ला रेल्वे क्वॉटर, पनखेड, तापडिया नगर, चांदूर, सावंतवाडी, कंवरनगर, नयागाव, बाळापूर नाका, लेडी हार्डिंग, बाबूळगाव, बाळापूर रोड, वनी, पिंपळखुटा, हिंगणा, जैन चौक, पंचशील नगर व तारफैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी बार्शीटाकळी व रामदासपेठ येथील प्रत्येकी पाच, गोयनका नगर व मलकापूर येथील प्रत्येकी चार, कौलखेड, डाबकी रोड व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, गायगाव, जुने शहर, महान, कृषी नगर, जठारपेठ, अशोक वाटिका, गायगाव व पिंपळखुटा येथील प्रत्येकी दोन, कॉग्रेस नगर, नांदखेड, खदान, अकोट, दहिहांडा, मारोती नगर,गंगा नगर, श्रीहरी नगर, हिरपूर, पुरणखेड, समता नगर, खरप ढोरे, स्टेशन एरिया, काटेपूर्णा, शेलूबाजार, तळेगाव, दगडपारवा, सहकार नगर, तापडिया नगर, विकास नगर, रामकृष्ण नगर, रणपिसे नगर, केलपाणी, सिटी कोतवाली, रेणुका नगर, बलोदे ले-आऊट, खोलेश्वर, शिवसेना वसाहत, शिवाजी नगर, रजपूतपुरा, गुलजारपुरा, रिधोरा, केशव नगर, चोहट्टा बाजार, नेरधामणा, रामनगर, जीएमसी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दोन महिला, एका पुरुषाचा मृत्यू

रविवारी सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. कैलास टेकडी, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व ३५ वर्षीय अनोळखी पुरुष रुग्णास २८ मार्च रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गंगानगर, अकोला येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

५२५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, हॉटेल स्कायलार्क येथून आठ, इंद्रा हॉस्पिटल येथून दोन, सहारा हॉस्पिटल येथून एक, खैर उम्मत हॉस्पिटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील तीन, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून नऊ, अकोला ॲक्सिडेंट येथून दोन, यकिन हॉस्पिटल येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून सहा, अवघाते हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, तर होम आयसोलेशन येथील ४२४ अशा एकूण ५२५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

६,४९४ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,२०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,२६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,४९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.