शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले-आउट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, सहकारनगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन, राऊतवाडी, बार्शीटाकळी, कलालची चाळ, गुडधी, तापडीयानगर, गोडबोले प्लॉट, न्यू तापडीयानगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यू भागवत प्लॉट, जवाहरनगर, गंगानगर, सिव्हील लाईन, गीतानगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंभोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
दोन पुरुष, एक महिला दगावली
मंगळवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला, सुकळी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष व केशव नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कापशी व अकोला येथील रुग्णास १ फेब्रुवारी, तर सुकळी येथील रुग्णास ६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
९५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सूर्याचंद्र हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८७ अशा एकूण ९५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७८४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.