शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १९५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तुकाराम चौक येथील २०, डाबकी रोड येथील १२, पातूर व लहान उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी आठ, मलकापूर, हरिहर पेठ व बाळापूर येथील प्रत्येकी सहा, तेल्हारा, मोठी उमरी, खदान, बार्शीटाकळी, व्याळा, कुंभारी, अकोट फैल, जामठा व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, खडकी, अनिकट, पुनोती बु., व्हीएचबी कॉलनी, पिंपळगाव, हाता, जुने शहर व शिवण खुर्द येथील प्रत्येकी तीन, राम नगर, जठारपेठ, अडगाव, गिरी नगर, आदर्श कॉलनी, गाडगे नगर, न्यू राधाकिसन प्लॉट, पिंपळोद, सिंधी कॅम्प, आनंद नगर, पोलीस क्वॉटर, जितापूर व एडंली येथील प्रत्येकी दोन, जीएमसी हॉस्टेल, महाकाली नगर, चावरे प्लॉट, रणपिसे नगर, शिवणी, आळशी प्लॉट, खंगरपुरा, बंजारा नगर, गायत्री नगर, काजळेश्वर, धोडगा, महान, सोपीनाथ पेठ, भीम नगर, अयोध्या नगर, चांदखॉ प्लॉट, लोकमान्य नगर, अपोती खुर्द, माळीपुरा, न्यू भागवत प्लॉट, शिवर, पोळा चौक, रेणुका नगर, न्यू तापडिया नगर, कृषी नगर, तापडियानगर, गड्डम प्लॉट, उरळ बु., नया अंदुरा, वाशिम बायपास, राधाकिसन प्लॉट, चिखलगाव, टेलिफोन कॉलनी, आपातापा, शिवसेना वसाहत, मनोरा, शिवाजी पार्क, खोलेश्वर, निमकर्दा, गंगा नगर, गांधी रोड, खैर मोहम्मद प्लॉट, बालाजी नगर, गीता नगर, जयहिंद चौक, शेलार प्लॉट, आलेगाव, दानापूर, वडगाव रोठे, तारफैल, पळसोबढे, अकोट, आझाद कॉलनी, इंदिरा कॉलनी, हिवरखेड, रवीनगर, रिंग रोड, माधव नगर, केशव नगर, मूर्तिजापूर, अंत्री बाळापूर, वाडेगाव व मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी पातूर येथील १२, मूर्तिजापूर येथील सात, कौलखेड येथील पाच, डाबकी रोड व गुडधी येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, शिवाजी नगर, वाशिम बायपास, सोनोरी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड, रवीनगर, खेतान नगर, विद्युत कॉलनी, तुकाराम चौक, कौलखेड जहांगीर, अकोट, लहान उमरी, तापडीयानगर, गायत्री नगर, रणपिसे नगर, ज्योती नगर, मोठी उमरी, जामठी, केशव नगर, गाडगे नगर व महालक्ष्मी नगर येथील प्रत्येकी दोन, न्यू खेतान नगर, आयटीआय कॉलनी, जुने आरटीओ ऑफिस, वर्धमान नगर, डीएचडब्लू हॉस्टेल, अकोट फैल, जीएमसी, खडकी, खदान, खगालपूरा, न्यू भीम नगर, सत्यदेव नगर, रघुवीर नगर, गजानन पेठ, देहगाव माणकी, निबंधे प्लॉट, शास्त्रीनगर, पिडब्यूर डी कॉटर, कोठारी वाटिका, सिरसो, गाजीपूर, शेलू बोंडे, शिवसेना वसाहत, गोडबोले प्लॉट, भौरद, हरिहर पेठ, गंगा नगर, शिवर, भारती प्लॉट, अनंत नगर, नवीन हिंगणा, लोकमान्य नगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन पुरुष, एक महिलेचा मृत्यू
उरळ, ता. बाळापूर येथील ५० वर्षीय पुरुष व माना ता.मूर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १५ व ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी वाडेगाव ता.बाळापूर येथील ७२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस १७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
९६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, कोविड केअर सेटर अकोट येथील सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, आयुर्वेदिक महाविद्यालयातून चार, बाईज हॉस्टेल अकोला येथील १३, तर होम आयसोलेशन येथील १० अशा एकूण ९६ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,३६८ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,१३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४१६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,३६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.