लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. माकडांच्या हल्ल्यात बेलखेड येथील महिलेला जीव गमवावा लागला, तर कित्येक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सोमवारी पुन्हा माकडांनी शहरात हैदास घातला. सेठ बन्सीधर विद्यालयात शिक्षण घेत असलेले राहुल नारायण सुईवाल (१६), राम गजानन कवळे (१७), नासीद सयद निसार (१७) हे तिघे दुपारच्या सुट्टीनंतर शाळेमध्ये जात असताना त्यांच्यावर माकडाने अचानक हल्ला चढवला. यामध्ये राहुल सुईवाल हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अकोला सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. माकडांच्या अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
माकडांच्या हल्ल्यात तीन विद्यार्थी जखमी, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:54 AM
तेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देघटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडलीमाकडांचा हैदोस; नागरिक त्रस्तमाकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी