अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे यंदा प्रवेशाच्या आकडेवारीवरून दिसून आले. यंदा ३,0३१ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. अभियांत्रिकी शाखा, पॉलिटेक्निक करूनही खासगी कंपन्यांमध्ये कमी पगाराची नोकरी मिळत असल्याने, विद्यार्थ्यांनी आयटीआय शाखेला पसंती दिली आहे.काही वर्षांपूर्वी आयटीआय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अवकळा प्राप्त झाली होती; परंतु अलीकडच्या दोन वर्षांमध्ये आयटीआय शाखेकडे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून पाहिल्या जाऊ लागले आहे. खासगी कंपन्यासुद्धा अभियांत्रिकीची पदवी घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्याला कमी वेतनात नोकरी देत आहेत. मुंबई, पुणे येथील कंपन्यांमध्ये १५ ते २0 हजार रुपये वेतनामध्ये शेकडो आयटीआय विद्यार्थ्यांना नोकºया मिळत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्कील इंडियासारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहेत. एवढेच नाही तर केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच स्वतंत्र व्यवसाय उभारावा, हा उद्देश आहे. औद्योगिक प्रशिक्षणातून खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमाकडे कल प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील १00 टक्के म्हणजे ३,0३१ जागांवर प्रवेश झाले आहेत. एकही जागा यंदा रिक्त नाही. हे विशेष.आयटीआयमधील अभ्यासक्रमइलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्युटर आॅपरेटर, टर्नर, मोटार मॅकेनिक, वायरमन, पेंटर (जनरल) आणि मुलींसाठी सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (इंग्रजी), ड्रेसमेकिंग, बेसिक कॉसमॅटोलॉजी, बेकर कन्फेक्शनर, फ्रुट्स अॅण्ड व्हिजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर आॅपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटेरियर डेकोरेशन अॅण्ड डिझाइन, फॅशन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखा उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेशअकोला- १,६८0बाळापूर- १७८मूर्तिजापूर- २३५बार्शीटाकळी- १७८तेल्हारा- १३१अकोट- ४७१पातूर- १२६
शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे आणि खासगी कंपन्यांसह महावितरण कंपनीत नोकरी सहज मिळते आणि स्वयंरोजगारही सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढल्यामुळे शासनानेसुद्धा यंदा आयटीआयची प्रवेश क्षमता १ लाख ३७ हजार जागांपर्यंत वाढविली. आयटीआयमध्ये जिल्ह्यातील सर्वच जागांवर प्रवेश झाले आहे. एकही जागा रिक्त राहिलेली नाही. हे यंदा प्रथमच घडले आहे.- महेश बंडगर,प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कोणताही विद्यार्थी रिक्त नाही. त्यांना सहज नोकरी उपलब्ध होते. त्यामुळेच आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. आयटीआयची एकही जागा रिक्त राहिली नाही. जागा कमी अन् विद्यार्थी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली.प्रमोद भंडारे,प्राचार्य, आयटीआय, मुलींची