अकोला: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी लाईन यार्डच्या रीमॉडेलिंग आणि एनई कामामुळे २२ आणि २३ मार्च रोजी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या कालावधीत महाराष्ट्र एक्स्प्रेससह तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. रद्द झालेल्या तीन गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागा कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूरहुन सुटणारी ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ व २२ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २२ व २३ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
नागपूरहुन सुटणारी १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस २१ मार्च रोजी, तर पुण्याहून सुटणारी १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस २२ मार्च रोजी प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. याशिवाय १२१३६ नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस २२ मार्च रोजी, तर १२१३५ पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २३ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाड्या च्या मार्गात बदलअकोला मार्गे धावणारी २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस व १२१२९ पुणे-हावडा एक्स्प्रेस या दोन गाड्या २२ मार्च रोजी वाडी-सिकंदराबाद-बल्लारशाह, नागपूर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. हावडाहून सुटणारी १२१३० हावडा-पुणे एक्स्प्रेस २० व २१ मार्च रोजी नागपूर-बल्लारशाह-सिकंदराबाद-वाडी-दौंड या मार्गाने वळविण्यात आली आहे.