लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्कूल व्हॅनमधून शाळेत ये-जा करणार्या एका विद्यार्थिनीसोबत ईल चाळे करणार्या स्कूल व्हॅनचालकाला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने दोषी ठरवीत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.मोठी उमरी येथील योगेश महादेव जावरकर हा स्कूल व्हॅनचालक असून, तो शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींची शाळेत ने -आण करीत होता. २७ सप्टेंबर २0१३ रोजी मोठी उमरी येथील ८ वर्षाची चिमुकली नेहमीप्रमाणे आरोपी योगेश याच्या ओमणी व्हॅनमधून सकाळी आठ वाजता शाळेत गेली होती. चिमुकलीचा वर्ग लवकर सुटल्याने ती व्हॅनमध्ये येऊन बसली. १0 मिनिटांनी हायस्कूलचे वर्ग सुटले आणि हायस्कूलची मुले व्हॅनमध्ये येईपयर्ंत दरम्यानच्या १0 मिनिटाच्या वेळेत आरोपी योगेश याने चिमुकलीसोबत ईल वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. घटनेच्या दुसर्या दिवशी मुलीला याच स्कूल व्हॅनमध्ये सोडण्यासाठी तिचे आई-वडील आले असता, या चिमुकलीने व्हॅनमध्ये बसण्यास नकार दिला व घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर चिमुकलीच्या आईने चिमुकलीसह रामदासपेठ पोलीस ठाणे गाठून व्हॅनचालक योगेश महादेव जावरकर याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३५४ अ, ७,८ पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली अढाव यांनी केला. त्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासले. त्यात पीडित चिमुकली, तिची आई व तपास अधिकारी यांचे बयाण महत्त्वाचे ठरले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून पोस्कोच्या कलम ८ मध्ये आरोपी योगेश महादेव जावरकर याला तीन वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली.
स्कूल व्हॅनचालकाला तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:44 AM
स्कूल व्हॅनमधून शाळेत ये-जा करणार्या एका विद्यार्थिनीसोबत ईल चाळे करणार्या स्कूल व्हॅनचालकाला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने दोषी ठरवीत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देशाळकरी विद्यार्थिनीचा केला होता विनयभंग