शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या तिघांना अटक

By admin | Published: April 12, 2017 2:11 AM

अकोला: वाहनामध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून ताजनापेठ चौकीजवळ पोलिसांनी पकडलेल्या वाहनचालकासह दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.

अकोला: वाहनामध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून ताजनापेठ चौकीजवळ पोलिसांनी पकडलेल्या वाहनचालकासह दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी जमाव गोळा करून पोलिसांवर दबाव टाकत, वाहनातील बैल गायब केले. पोलिसांच्या हाती एकच बैल लागला. रामदासपेठ पोलिसांनी वाहनचालकासह दोघांना अटक केली. रामदासपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी बबन विरूळकर हे सोमवारी रात्री गस्तीवर असताना, अमरावती येथील ताज नगरात राहणारा सोहेल खान इब्राहिम खान (२४) हा एका वाहनामध्ये बैलांना निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले. त्यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु सोहेल खान याने वाहन थांबविले नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. ताजनपेठ परिसरात पोलिसांनी वाहन पकडताच, आरोपी सोहेल खानसह मोहम्मद हारूण मोहम्मद फारूक (२४ रा. कागजीपुरा) आणि जावेद खान अहमद खान (४२ रा. बैदपुरा) यांनी गैरकायदेशीर मंडळी गोळा करून पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला आणि वाहनातील आठ बैलांपैकी सात बैल गायब केले. पोलिसांना एकच बैल मिळून आला. आरोपींनी शासकीय कामात हस्तक्षेप करून बैल गायब केले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रामदासपेठ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३५३, २0१, १४३ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील व शहरातील सर्व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले होते.