संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज सेतू केंद्रांवर भरण्यात येत आहे त; मात्र ऑनलाइन अर्ज भरताना बायोमेट्रिक मशीनवर आधार क्रमांकाशी अनेक शेतकर्यांचा अंगठा (थम) संलग्नित (मॅच) होत नसल्याने, कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरणार कसा, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात ‘अंगठा ’ संलग्नि त करण्याचा अडसर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने या प्रश्नावर जिल्हय़ातील शेतकर्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शे तकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शे तकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे काम गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू असून, ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर पर्यंंत आहे. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ा त सेतू केंद्रांवर शेतकर्यांची गर्दी होत आहे. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी दाम्पत्यांचा बायोमेट्रिक मशीनवर अंगठा घेऊन आधार क्रमांकाशी जोडला जात आहे; मात्र या प्रक्रियेत अनेक शेतकर्यांचा अंगठा आधार क्रमांकाशी संलग्नित होत नसल्याने, सेतू केंद्रांकडून संबंधित शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात अडसर निर्माण झाला आहे. आधार क्रमांकाशी अंगठा संलग्नित होत नसल्याने, कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरणार कसा, असा प्रश्न जिल्हय़ातील अनेक शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने या प्रश्नावर अनेक शेतकर्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.
आधार क्रमांकाशी अंगठा ‘अपडेट’ करण्याचे काम सुरू!बायोमेट्रिक मशीनवर आधार क्रमांकाशी अंगठा संलग्नित होत नसलेल्या शेतकर्यांचा अंगठा आधार क्रमांकाशी ‘अ पडेट’ करण्याचे काम मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया तील लोकशाही सभागृहात सुरू करण्यात आले. आधार क्रमांकाशी अंगठा अपटेड करण्यासाठी शेतकर्यांची गर्दी झाली होती.
शेतकरी दाम्पत्यांना असा येत आहे अनुभव!कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी दाम् पत्याचे बायोमेट्रिक मशीनवर घेतले जात आहेत. त्यापैकी प त्नीचा अंगठा आधार क्रमांकाशी जुळते, तर पतीचा जुळत नाही, तसेच पतीचा अंगठा आधार क्रमांकाशी जुळते, तर प त्नीचा जुळत नाही आणि काही शेतकरी दाम्पत्याचे पती व पत्नी असे दोघांचेही अंगठे आधार क्रमांकाशी जुळत नसल्याचा अनुभव येत आहे.