शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मेळघाटातील वाघांचा संचार वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:13 PM

अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पिंप्री जैनपूर, पिंप्री खुर्द शेतशिवारात मंगळवारी वाघ आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावाजवळील केळीच्या शेतात वाघोबा चक्क दिवसभर ठाण मांडून बसले होते. या पृष्ठभूमीवर मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनवर्सन झाल्याने वाघाला मोकळा श्वास मिळाला हे जरी खरे असले तरी वाघांचा संचार चिंता वाढविणारा आहे.मेळघाटातील अंबाबरवा व संलग्नित वनगावांचे यशस्वी पुनवर्सन झाल्याने काही प्रमाणात वाघांचा संचार मार्ग मोकळा झाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या माहितीवरून या क्षेत्रात तब्बल ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांचे बछडे आहेत. व्याघ्र अधिवासात शिकारीची कमतरता भासली म्हणून वाघ त्यांच्या क्षेत्राबाहेर येतात. प्रादेशिक वनक्षेत्रातील वन जमिनीवर वाढणारे अतिक्रमण, विकास प्रकल्प, अवैध गुरे चराई, रस्त्यांचा विकास, वाढती शिकार, संचार मार्गाचा होणारा ºहास अशा कारणामुळे जंगलांची अवस्था बिकट होत आहे. म्हणून वाघांचा आणि मानवांचा संघर्ष होताना आपण पाहतो आहे. एकीकडे गेल्या वर्षभरात व्याघ्र हल्ल्यात भारतात सर्वाधिक माणसांचे मृत्यू १५ विदर्भात झाले असताना दुसरीकडे २० वाघांना आपला जीवही गमवावा लागला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बुलडाणा जिह्यातील अंबाबरवा अभयारण्य हा अतिशय महत्त्वाचा संचार मार्ग आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्र व यावल अभयारण्य, पुढे अकोला जिल्ह्यातील वान अभयारण्य, उत्तरेकडे रावेर वनक्षेत्र मार्गे यावल तर पुढे अनेरडॅम (धुळे) अभयारण्याशी हे क्षेत्र जोडलेले आहे. मेळघाटमधील वाघ वान, अंबाबरवा मार्गे वडोदा वनक्षेत्रात संचार करतात. त्यामुळेच वाघांचे शितशिवारात दर्शन वाढले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वाघ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. वाघ टिकला तरच अन्नसाखळी व परिसंस्था समृद्ध राहते. आपण वाघाला मोकळा श्वास दिला पाहिजे. गावालगत वाघांचे दर्शन होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण होते; मात्र त्यासाठी वन विभागाची मदत घेऊन उपाय शोधणे गरजेचे आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

टॅग्स :AkolaअकोलाMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघ