लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शासनाने नाफेड तूर खरेदी पुन्हा सुरू केली असली, तरी मोजमाप करताना तुरीमध्ये आद्र्रता जास्त असल्याचे कारण पुढे करून शेतकर्यांचा माल मोजमापाविना घरी परत नेण्याची वेळ येत आहे.तालुक्यात नाफेड अंतर्गत तूर खरेदी सुरू असून, आजपर्यंत ४८ हजार क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली. दरम्यान, खरेदी बंद झाल्याने तालुक्यात ४६ हजार क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत होती. शेतकर्यांच्या मागणीनंतर पुन्हा तूर खरेदी सुरू झाली. यामध्ये खरेदी करताना शेतकर्यांच्या तुरीचा पंचनामा करून तूर खरेदी सुरू झाली. वास्तविक पाहता शेतकर्यांच्या तुरीची तलाठी, कृ षी सहायक यांच्यामार्फत तपासणी झाली असताना तूर मोजमापासाठी आणताना पुन्हा आद्र्रता व विविध कारणांनी तूर खरेदी करताना खोडा निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून येत आहेत. याबाबतचे निवेदन परिसरातील शेतकर्यांनी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्याकडे दिले. निवेदनावर रामधन अग्रवाल, सुबोध राऊत, राकेश गुप्ता, शशिकांत चोपडे, वंदना चोपडे, योगेश जवंजाळ, ज्ञानदेव खारोडे, भास्कर खारोडेंसह अनेक शेतकर्यांच्या सह्या आहेत.
तेल्हारा तालुक्यात तूर खरेदी अद्यापही वांध्यातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 7:50 PM
तेल्हारा : शासनाने नाफेड तूर खरेदी पुन्हा सुरू केली असली, तरी मोजमाप करताना तुरीमध्ये आद्र्रता जास्त असल्याचे कारण पुढे करून शेतकर्यांचा माल मोजमापाविना घरी परत नेण्याची वेळ येत आहे.
ठळक मुद्दे तूर खरेदीला आद्र्रतेचा खोडा शेतमाल घरी नेण्याची शेतकर्यांवर वेळ