शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

रिधोरा येथील कॅन्सर हॉस्पिटलला टीना अंबानींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 2:54 PM

व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली.

ठळक मुद्देदुपारी १२ वाजताच्या सुमारास टिना अंबानी यांचे खासगी विमानाद्वारे अकोला विमानतळावर आगमण झाले. हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी आल्याचे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.हॉस्पिटलच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, सोमवारी या ठिकाणी पुजाविधी आटोपण्यात आला.

- अनिल गिऱ्हे 

व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या पुजाविधीत सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या.दुपारी १२ वाजताच्या सुमारास टिना अंबानी यांचे खासगी विमानाद्वारे अकोला विमानतळावर आगमण झाले. त्यानंतर त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरील रिधारा गावाकडे रवाना झाला. रिधोरा ते व्याळा दरम्यानच्या कलकत्ता धाबा जवळ रिलायन्स समहुातर्फे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, या हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी आल्याचे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, सोमवारी या ठिकाणी पुजाविधी आटोपण्यात आला. टिना अंबानी या सोहळ्यात सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत गव्हर्निंग कौन्सिल सदस्य के. नारायण,  तूषार मोतीवाला यांच्यासह कार्यकारी संचालक डॉ. रामनारायणन, संतोष शेट्टी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे यांची उपस्थिती होती.

लवकरच होणार लोकार्पणकॅन्सर हॉस्पिटलचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. त्याची तयारी म्हणून टिना अंबानी येथे आल्याची माहिती आहे.

विमानतळावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेटरिधारो येथून परत अकोला येथील शिवनी विमानतळावर आल्यानंतर टिना अंबानी यांनी बुलडाणा येथील आढावा बैठक आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी दोघांमध्ये औपचारिक चर्चा झाली. टिना अंबानी यांनी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलRelianceरिलायन्स