तेल्हारा : तेल्हारा-माळेगाव बाजार रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्यावर तेल्हारानजीक ट्रक फसल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. फसलेल्या ट्रकला काढण्यासाठी गेलेली जेसीबी मातीत अडकल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टिप्पर उलटल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहनचालकांसह नागरिक हैराण झाले आहेत.
गत दोन वर्षांपासून तालुक्यातील माळेगाव बाजार, हिवरखेड, अडसूळ, पाथर्डी या मुख्य रस्त्यावर अपघात वाढले आहेत. गुरुवारी तेल्हाऱ्यानजीक माळेगाव बाजार रस्त्यावर ट्रक फसला. त्यामुळे ट्रकला बाहेर काढण्यासाठी ‘जेसीबी’ला पाचारण करण्यात आले होते. ट्रकला काढताना जेसीबी फसल्याने एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि.१६) टिप्पर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. प्रवाशांना मात्र ताटकळत बसावे लागले. (फोटो)
------------------------------------------
ट्रक पुलावरून खाली कोसळला!
पातूर: तालुक्यातील देऊळगावनजीक पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. गुजरात राज्यातून नांदेडकडे जाणारा (जीजे ३६, टी ५१५७)चे स्टेअरिंग राॅड तुटल्याने ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रकचालक व सहकारी बचावले. (फोटो)