राजरत्न सिरसाट
अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आतापर्यंत ७ लाख ६० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, त्यापोटी शेतकऱ्यांना ४०० पैकी २०० कोटी रुपयांचे चुकारे केले आहेत. उर्वरित दोनशे कोटी रुपयांचे चुकारे मात्र थक ले आहेत. राज्यात ‘पणन’ ‘सीसीआय’ व व्यापारी मिळून आतापर्यंत जवळपास ४८ लाख क्ंिवटलवर कापूस खरेदी करण्यात आला आहे.
राज्यात यावर्षी कपाशीचे क्षेत्र एक लाख हेक्टरने वाढले असून, अतिपावसामुळे हंगाम एक महिना लांबल्याने कापूस वेचणीलाही उशिराने सुरुवात झाली. (सीसीआय) भारतीय कापूस महामंडळ व पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब झाल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांनी खासगी बाजारात कापूस विक्री केली. त्यामुळे व्यापाºयांनी सर्वाधिक ३० लाख क्ंिवटलवर कापूस खरेदी केला. सीसीआयने जवळपास ९ लाख तर पणन महासंघाने ७ लाख ६० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला. पणन महासंघाने अपवाद वगळता प्रतिक्ंिवटल ५,५०० रुपये या आधारभूत किमतीनुसार कापसाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांनी यावर्षी पणन महासंघाला कापूस विकला. सद्यस्थितीत राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकºयांनी कापूस वेचणी व विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे खासगी बाजारासह सीसीआय व पणन महासंघाकडे कापसाची आवक वाढली आहे; परंतु ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तेथीलखरेदी केंद्र पावसाळी वातावरण निवळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्यण पणन महासंघाने घेतला आहे. यामध्ये अमरावतीतील दर्यापूर कापूस खरेदी केंद्राचा समावेश आहे.खासगी बाजारात भाव वाढले!सरकीच्या भावात प्रतिक्ंिवटल ३०० रुपयांनी वाढ झाल्याने खासगी बाजारात कापसाचे भाव३०० रुपयांनी वाढले आहेत. या भावात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत कापूस उद्योजकांनी दिले. गत आठवड्यात हे दर प्रतिक्ंिवटल ४,९५० रुपये होते, ते आजमितीस ५,२५० रुपये आहेत. राज्यात आतापर्यंत ४८ लाख क्ंिवटलवर कापसाची खरेदी झाली असून, ‘पणन’ने अपवाद वगळता प्रतिक्ंिवटल ५,५५० रुपयांनी ७ लाख ६० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला. शेतकºयांना या खरेदीचे ४०० कोटी रुपये चुकारे द्यायचे होते.त्यातील २०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले असून, उर्वरित चुकारे लवकरच शेतकºयांना केले जाणार आहेत. - अनंत देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ.