शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
अकाेला : शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० एमएम व्यासाची जलवाहिनी खडकी येथे झंडू कन्ट्रक्शनच्या खाेदकामात क्षतिग्रस्त झाली असून जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे़ यामुळे जुने शहरातील शिवनगर जलकुंभ व बस स्टॅण्डलगतच्या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे़
पाण्यासाठी जनावरांची भटकंती
अकाेला : शहरात पुन्हा एकदा वाढत्या उन्हामुळे अकाेलेकरांच्या जीवाची लाही लाही हाेत आहे़ मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला असून भटक्या जनावरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ शहरातील प्राणीमित्रांनी भटक्या जनावरांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे़
‘न्यू तापडिया नगरात पाेलिस चाैकी उभारा’
अकाेला : प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडिया नगर, खरप, पंचशील नगर व दुबे वाडी या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी आधार फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
‘पीएम’आवासच्या लाभार्थ्यांची परवड
अकाेला : पंतप्रधान आवास याेजने अंतर्गत महापालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरकूल बांधून देण्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरु आहे़ आजपर्यंतही अनेक लाभार्थी याेजनेपासून वंचित असल्याचे समाेर आले आहे़ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा हाेत नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत़
कंटेन्मेट झाेनमध्ये नियमांची पायमल्ली
अकाेला : शहरातील पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या दाेन्ही झाेनमधील काही भाग कंटेन्मेंट झाेन घाेषित केले आहेत़ तरीही या भागात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे समाेर आले आहे़ यावर आता मनपाने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे़