अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार, ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षामार्फत अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत बुधवारीच पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे पत्र (ए-बी फॉर्म) सादर करावे लागणार आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाचे वितरण, उमेदवारी दाखल करणे व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार, ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बुधवारी गर्दी होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमार्फत अधिकृत उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना पक्षाने प्राधिकृत केलेल्या उमेदवारीबाबतचे पत्र (ए व बी फॉर्म) उमेदवारी अर्जासोबत बुधवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करावे लागणार आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
By admin | Published: December 09, 2015 2:52 AM