अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड होणार आहे.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
उमेदवारी अर्जांची
उद्या छाननी !
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३० डिसेंबर रोजी सायंकळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये होणार आहे.