अकोला, दि. ६-महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार्या इच्छुकांना अर्ज मागे घेण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोमवारी निवडणूक रिंगणातून १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना २७ जानेवारी ते ३ फे ब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ७५0 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या स् तरावर छाननी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज निवडणूक प्रक्रियेतून मागे घेऊ शकतात. ५ फेब्रुवारी रोजी रविवारी सुटी असल्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे कामकाज बंद होते. सोमवारी दिवसभर पाच झोन कार्यालयातून एकूण १७ इच्छुक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. झोन क्रमांक २ मधून ७ जणांची माघारमहापालिका क्षेत्राची हद्दवाढ केल्यानंतर प्रशासनाने प्रभागांची पुनर्रचना केली असता, २0 प्रभागांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक प्रभागातून ४ यानुसार एकूण ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. प्रभागांची संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ५ झोन कार्यालयांचे गठन करून त्याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती केली. यामध्ये झोन क्रमांक २ मधून सर्वाधिक म्हणजेच ७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले. उद्या चित्र होणार स्पष्टमनपाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उद्या, मंगळवारी शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रणसंग्रामात नेमके कोणते उमेदवार कायम राहतात, याचे चित्र उद्या स्पष्ट होईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
By admin | Published: February 07, 2017 3:24 AM