शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अकोला : आज मोर्णा नदी स्वच्छता मिशनचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:46 AM

अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा होणार आहे. या मोहिमेत अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होईल. 

ठळक मुद्देजलपर्णीचा नकोच विळखा महाविषारी घातक फार सारे मिळूनी हात लावूया, करुन टाकू त्या तडीपार !

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा होणार आहे. या मोहिमेत अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होईल. कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोर्णा नदीची शहरातील सांडपाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. नदीपात्रात जलकुंभीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा झाला असून, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीची स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत शहरातील राजकीय, अराजकीय संस्था, संघटनांसह अकोलेरांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे. ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने यशस्वी करावयाची असून, या महायज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. 

१४ पथकांचे गठनस्वच्छता मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली १४ पथकांचे गठन करण्यात आले असून, तहसीलदार, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या समन्वयातून विविध १४ ठिकाणी साफसफाई मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता १४ ठिकाणी श्रमदान करण्याची गरज आहे.

सेवाभावी संस्थांचा पाठिंबामोर्णा नदी स्वच्छता मिशनला शहरातील अनेक सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना, कच्छी मेमन जमात, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने २0 वाहने, महामार्गांची कामे करणार्‍या संघटनेने पोकलेन तसेच सहा जेसीबी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी जलकुंभी काढणारे यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

अनुभवी कामगार नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेण्यात येणार आहे. त्यानंतर काठावरील जलकुंभी नागरिकांनी मनपाच्या ट्रॅक्टर व घंटागाडीत जमा करावी. साहित्य मनपाकडून उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांच्या सुविधेसाठी सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहाय्यता पथक, पाणी व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक हजर राहणार आहे.

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहर