शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

आजपासून लालपरी रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 6:00 AM

कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून अकोला येथून गुरुवार, २० आॅगस्टपासून ‘लालपरी’ रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

अकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर गत चार महिन्यांपासून ठप्प असलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी)आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवाणगी दिली असून, याअनुषंगाने एसटीच्याअकोला विभागाने सर्व प्रमुख मार्गांवर गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून अकोला येथून गुरुवार, २० आॅगस्टपासून ‘लालपरी’ रस्त्यावर धावताना दिसणार आहे.प्रवाशी वाहतूक एकदम पूर्ववत होणार नसली तरी प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेवून बसगाड्यांचे शेड्यूल ठरविण्यात येणार आहे. प्रवाशी मर्यादा निश्चित करण्यात आल्याने तुर्तास निम्म्या प्रवाशांवरच ही वाहतूक होणार असल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अकोला येथून लगतच्या जिल्ह्यांच्या ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकही सुरु होणार असून, प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो यानुसार बस सोडण्यात येणार आहेत. तूर्तास तालुक्यांच्या ठिकाणीच बसेस धावणार असून, हळूहळू प्रवाशांच्या भारमानाचा अंदाज घेऊन बससेवा विस्तारीत करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे आदी नियमांच्या अधिन राहून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे.वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक!एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येणार असून, प्रवास करणाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. ई-पासची मात्र कोणतीही गरज नसल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी सांगितले.आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक सुरु करण्यात येणार असून, सर्व प्रमुख मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकाने निश्चित केलेल्या नियमानूसार एकूण क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना कोविड-१९ नियमांचे पालन करून बससेवा सुरु करण्यात येणार आहे. - चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, अकोला

 

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला