लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे. रविवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य मिरवणुकीसह सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३३ वर्षां पासून अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने होत असलेला हा सोहळा वैचारिक पर्वणी ठरला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक क्रीडा मंडळ सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी क्रिकेट क्लब मैदानावर धम्ममेळाव्यात भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी राहतील. अतिथी म्हणून भंते बी. संघपाल उ पस्थित राहतील.
आज धम्मचक्र प्रवर्तन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:00 AM
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशनिवारी शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनअशोक वाटिका येथे सकाळी वंदनाशहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे