शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कर्जमाफीच्या अर्जांचे आजपासून चावडी वाचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:28 AM

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. 

ठळक मुद्दे८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विभागाच्या ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना २६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील तालुका स्तरावर चावडी वाचनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील. कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी चावडी वाचन करून त्रुटींचे निरासन करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी अवश्य घ्यावा, त्यासाठी चावडी वाचनास उपस्थित राहावे,- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला -