अकोला : टमाटे आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. आठ ते दहा रुपये किलोच्यावर ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला दररोजचा शेतमाल बाजारात आणणेदेखील परवडत नसल्याची स्थिती आहे. भाव मिळत नसल्याने अनेकदा आणलेला माल बाजारपेठेत फेकून देण्याची वेळ शेतकºयावर येत असल्याचे विदारक चित्र आहे.बुलडाणा परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अकोला बाजारपेठेत येतात. टमाट्यांची आवक सातत्याने वाढत असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी टमाट्यांवर कीड पडल्याने टमाट्यांचे भाव घसरले. ते अजूनही जागेवर आलेले नाही. टमाट्यांची बाजारपेठ सावरलेली नसताना कांद्याचे भाव आता पडले आहे. हिरवा कांदा आणि मोठा कांद्याचेही भाव आठ ते दहा रुपये किलोच्या पलीकडे जात नसल्याने शेतकरी हादरले आहेत. वाढत्या पेट्रोल-डीझलच्या भाववाढीमुळे शेतमाल आणण्यासाठी ठरावीक रक्कम मोजावीच लागते. बाजारपेठेत आल्यानंतर मात्र पाहिजे तेवढी किंमत मिळत नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. अनेकदा आठ रुपयांच्या खालीदेखील टमाटे-कांद्याचे भाव घसरत असल्याने हा माल अडते मागतील त्या भावात सोडण्याची वेळ आली आहे. जर भावच मिळाला नाही, तर अनेकदा शेतकरी आपल्या कांद्याचा माल उघड्यावर टाकून जात आहेत. कारण परत नेला तर पुन्हा वाहतुक खर्च द्यावा लागेल. त्यापेक्षा मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
भाजीपाल्याचे ठोकचे भाव(प्रतिकिलो ग्रॅम)पालक १०-१२ रुपये, मेथी १२-१५, कारले १८-२०, चवळी शेंग १८-२०, वालशेंग १८-२०, वांगे १८-२०, लवकी १८-२०, भेंडी २५-३०, हिरवे वाटाणे २२-२५, गाजर १२-१५, शेपू २२-२५, आलू १३-१५, हिरवी मिरची १५-२०, फुलकोबी-पत्ताकोबी १०-१२, गवार शेंग २२-२५, तुरई २०-२५, सांभार १०-१२ असे आहे.
परिसरातील शेतकºयांना फटकाअकोला जिल्ह्यातील चांदुर, खडकी, अकोट, बाळापूर, पातूर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. यामध्ये हिरवा ताजा कांदाही आहे. अकोला बाजारपेठेत हिरवा कांदा आणणाºया उत्पादकांना पडलेल्या बाजारभावाचा सामना करावा लागत आहे. अंतर आणि प्रवास खर्च सोसणे सोयीस्कर असल्याने परिसरातील शेतकºयांना अकोला बाजारपेठेशिवाय दुसरा पर्याय आजतरी उपलब्ध नाही.