शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत उद्या!

By admin | Published: October 04, 2016 2:27 AM

राजकारणाची समीकरणे बदलणार असून सोडतीकडे अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अकोला, दि. ३- नगरपालिकांचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असून, या पदासाठीची आरक्षण सोडत बुधवार, ५ ऑक्टोबरला मुंबई येथे निघणार आहे. नगरविकास मंत्रालयाने तसा आदेश निर्गमित केल्याने सर्वांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे. इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. प्रभाग रचना आणि नगरसेवकांचे आरक्षण गेल्या महिन्यातच घोषित झाले. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; परंतु नगराध्यक्षांच्या आरक्षणाला विलंब होत होता. अखेर नगरविकास विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १ ऑक्टोबर रोजी आदेश निघाला. या आदेशानुसार राज्यातील नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत ५ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयातील परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका प्रभागात चार वॉर्ड समाविष्ट होते. आता दोन वॉर्ड मिळून एक प्रभाग झाल्यामुळे आणि यावेळी वॉर्डाची, प्रभागाची पुनर्रचना केल्यामुळे बर्‍याच विद्यमान नगरसेवकांना वॉर्ड बदलावा लागणार आहे. काही वॉर्डात नव्या चेहर्‍यांना संधीसुद्धा मिळू शकते. अध्यक्ष पदाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात बदल होईल व तेसुद्धा थेट जनतेतून असल्याने जनता जनार्दन कुणाच्या बाजूने कौल देणार, ते येणारा काळच दाखवून देणार आहे; मात्र यासाठी अनेक नवरदेव पडद्यामागे बाशिंग बांधून तयारीत आहेत, हे विशेष.