अकोला : नेहरु पार्क चौकाकडून निमवाडी परिसरात येत असलेल्या एका खासगी लग्झरी बसच्या टुलकीटचे मागील बाजुचे झाकन अचाणक उघडल्याने पाठीमागून दुचाकीवर असलेल्या एका तलाठ्याच्या दुचाकीवर जबर झटका लागून झालेल्या विचीत्र अपघातात तलाठ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडला.
चिखलगाव येथील रहीवासी तथा सद्या उमरी परिसरात वास्तव्यास असलेले तलाठी निळकंठ थोरात यांच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचे सावटण्यासाठी ते दुचाकीने उमरीकडून चिखलगाव येथे शनिवारी सकाळी जात होते. नेहरु पार्क चौकातून उड्डाण पुलावरून दुचाकी जात असतांना निमवाडी परिसरात समोर असलेल्या इंदुमती ट्रॅव्हल्स एम एच ०९ इ एम ७३४१ क्रमांकाच्या खासगी बसच्या मागील भागात असलेल्या टुल कीटचे झाकण अचाणक उघडले.
त्यामुळे पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वार तलाठी निळकंठ थोरात यांना जबर झटका बसताच ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्यावर व शरीराला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताचा खासगी बसचालकाला पत्ताही नसल्याने तो बस घेउन निघून गेला. काही वेळातच पोलिसांना या अपघाताची माहीती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपाणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.