लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील साफसफाईची कामे करीत आहेत. असे असताना सफाई कर्मचाºयांच्या आरोग्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाºयांना टाळेबंदी लागू झाल्यापासून आजपर्यंत केवळ दोन वेळा हातमोजे व मास्कचे वितरण झाले आहे. हातमोजे फाटले असून, वेळेवर सॅनिटायझर उपलब्ध होत नसल्याने जीविताला धोका निर्माण झाल्याची खंत सफाई कर्मचारी व्यक्त करीत आहेत. महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता महापालिका प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. या तीनही यंत्रणांमधील अधिकारी- कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या परिसरात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी तसेच या भागातील स्थानिक रहिवाशांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यासाठी मनपाची यंत्रणा सेवारत आहे. दुसरीकडे शहरातील सर्व्हिस लाइन व त्यामधील नाल्यांची दैनंदिन साफसफाई करण्याचे काम मनपाच्या आस्थापनेवरील तसेच पडीत प्रभागातील खासगी सफाई कर्मचारी बजावत आहेत.प्रभागांमध्ये सकाळी ७ वाजतापासून साफसफाईच्या कामाला सुरुवात करणारे सफाई कर्मचारी व रस्त्यांची झाडपूस करणाºया महिला कर्मचारी सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत त्यांचे काम निकाली काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांची भेट घेतली असता कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीचा मुकाबला करीत असताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणतीही ठोस सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही बाब महापालिका प्रशासनाने गंभीरतेने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोरोना योद्धा असल्याचे समाधान पण...शहरवासीयांकडून केली जाणारी घाण व अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. कोरोनासारख्या आपत्तीचा मुकाबला करताना आमच्याही जीवाला या आजाराचा संसर्ग होऊ शकतो, याची संपूर्ण जाण आम्हाला आहे. तरीही आम्ही
आमची जबाबदारी पार पाडत आहोत. या लढाईत कोरोना योद्धा असल्याचे आम्हाला समाधान असले तरी प्रशासनाने आमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा असल्याचे सफाई कर्मचारी सुभाष सावरिया, ईश्वर गायकवाड यांनी सांगितले.
सुरक्षा साधने देण्यात कुचराईकोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी लागू केली. ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. यादरम्यान २७ मार्च रोजी मनपाच्या सफाई कर्मचाºयांना हातमोजे व मास्क देण्यात आले होते. त्यानंतर थेट १२ एप्रिल रोजी दुसºयांदा हातमोजे व मास्कचे वाटप करण्यात आले. मनपाने दिलेले हातमोजे अवघ्या तिसºया व चौथ्या दिवशी फाटत असल्याचा अनुभव सफाई कर्मचाºयांनी सांगितला. तसेच संपूर्ण कामादरम्यान एकच मास्क वापरावा लागत असल्याने तो असुरक्षित ठरत असल्याची भावना सफाई कर्मचारी यांनी व्यक्त केली.