अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पर्यटनासह सर्वच क्षेत्रात झाला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावरही पर्यटकांचा स्थानिक पर्यटनाकडेच कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य पुढील वर्षभर अंधारात राहण्याची शक्यता असून,मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. उन्हाळ्यातील एप्रिल ते जुलै हे महिने पर्यटनासाठी सुगीचे दिवस असतात; परंतु लॉकडाऊन असल्यामुळे हा व्यवसाय हातातून गेला आहे. या उद्योगाशी निगडित अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना गेल्यानंतरही किमान १ वर्ष तरी अशीच परिस्थिती राहणार असल्याचेही व्यावसायिक सांगतात.
अनेकांचा उदरनिर्वाह निर्भरपर्यटनासाठी नियोजन करून देणाऱ्या टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी व त्यांच्याशी निगडित अनेकांना रोजगार प्राप्त होते. यामध्ये वाहन मालक, चालकापासून ते हॉटेल, स्वयंपाकी, कुली, मदतनीसासह गाइडपर्यंतच्या सर्वांचा समावेश आहे; पण कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने या सर्वांचा रोजगार गेला आहे.
एसटी बस पूर्ण क्षमतेने, ट्रॅव्हल्सला कोरोना नियमअनलॉकच्या प्रक्रियेत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस पूर्ण क्षमतेने धावत आहेत; मात्र ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बससाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. क्षमतेच्या अर्धेच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन कायम असल्याने आधीच अडचणीत आलेल्या या व्यवसायाला नियमांचाही फटका बसत आहे.