शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर ‘ट्रॅकर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:28 AM

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४ ...

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४ हजार ८२१ वाहनांवर जीपीएस, जीपीआरएस प्रणाली अंतर्गत ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. हा उपक्रम बाह्य यंत्रणेच्या साहाय्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय रुग्णवाहिका, मोबाइल मेडिकल युनिट वाहने, आरोग्य विभाग, पर्यवेक्षीय वाहने तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या एकूण ४ हजार ८२१ वाहनांवर ‘जीपीएस’ किंवा ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविली जाणार आहे. यासोबतच राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णावाहिकांचे आरक्षण व मोबाइल मेडिकल युनिटचे ट्रॅकिंग करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करणे, तसेच १०२ कॉल सेंटर चालविण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्यासंदर्भात राज्य शासनाने गुरुवारी शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार, राज्यातील ४,८२१ वैद्यकीय वाहनांवर ट्रॅकर बसविण्यात येणार आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. त्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. यासंदर्भात पुढील निर्देश आल्यावर जिल्हास्तरावर कार्यवाही करू.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य