भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर हाेणार कमी
आज राेजी मनपाकडे भाडेतत्त्वावरील ३४ ट्रॅक्टर आहेत. यावरील चालक, मजुरांच्या मानधनापाेटी प्रतिदिवस एक हजार रुपये, तसेच ६ लिटर इंधन मनपाकडून उपलब्ध करून दिले जाते. नवीन वाहने खरेदी केल्यानंतर भाडेतत्त्वावरील वाहने कमी केली जाणार असल्याची माहिती आहे.
वर्षाकाठी ७ काेटी ९ लाखांचा खर्च
मनपाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरवर हाेणारा खर्च महिन्याकाठी ५९ लक्ष रुपयांपेक्षा जास्त हाेत आहे. वर्षाकाठी हा खर्च तब्बल ७ काेटी ९ लाखांवर हाेत असल्याची माहिती आहे. या सर्व बाबींचे मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी सूक्ष्म अवलाेकन केल्यानंतरच नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्याचे बाेलले जात आहे.
सत्ताधारी, प्रशासनात खलबते
प्रशासनाच्या स्तरावर नवीन दहा ट्रॅक्टर खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळताच गुरुवारी या मुद्यावर सत्तापक्षातील काही पदाधिकारी व प्रशासनात दिवसभर खलबते रंगली हाेती. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत एमजी पाेर्टलच्या माध्यमातून नाेंदणीकृत पुरवठादाराकडूनच ट्रॅक्टर खरेदीचे निर्देश आहेत.