लोकमत न्यूज नेटवर्कसिरसोली : येथील दीपचंद पुरुषोत्तम अडाणी यांनी त्यांच्या २२ जून रोजी चार एकरात शेतामध्ये ज्वारीची लागवड केली; परंतु ज्वारी पिकावर मूर रोगाचे संक्रमण झाल्यामुळे पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. हवालदिल झालेल्या शेतकºयाने चार एकर ज्वारीवर ट्रॅक्टर फिरविला.परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मूर रोगाचे संक्रमण सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांवर आता रब्बीशिवाय पीक घेण्याचा पर्याय राहिला नाही. दीपचंद अडाणी यांनी चार एकरात ज्वारीची लागवड केली. पिकाची वाढ झाल्यानंतर त्यावर मूर रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे शेतकºयांनी पिकावर फवारणीसुद्धा केली आहे; परंतु फवारणी करूनही ज्वारी पिकावरील मूर रोगाचे नियंत्रण झाले नाही. ज्वारीचे पीक मूर रोगाने नष्ट झाल्यामुळे अखेर शेतकºयाने पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीकच नांगरून काढले आहे.असाच प्रकार सुरेंद्र पद्माकर खोटरे यांच्या शेतात पिकावरसुद्धा या किडीने आक्रमण केले. त्यामुळे त्यांनीसुद्धा सहा एकर क्षेत्रातील ज्वारीच्या पिकावर नांगर फिरविला. मूर रोगामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने, शेतकरी हवालदील झाला आहे.
शेतकºयांनी पिक नष्ट न करता ज्वारी पिकावरील मूर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान २५ ईसीचे प्रति पंप ३५ मिली याप्रमाणे फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा.