राजस्थान येथील राहणारा भगवान सिंग गोपालसिंग राजपूत रविवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन जात असताना, पिंजर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान त्याचा आरजे ०६ आरसी १११६ क्रमांकाचा ट्रॅक्टर अडविला. ट्रॅक्टरची तपासणी करताना, पोलिसांनी ट्रॅक्टरच्या एका पेटीत डिटोनेटरच्या १६१ व जिलेटिनच्या २१० कांड्या आढळून आल्या. त्याच्याकडे परवाना विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पिंजर टाऊनचे जमादार राजू वानखडे व त्याचे सहकारी नाकाबंदी करीत असताना, त्यांनी हा स्फोटक पदार्थ वाहून नेणारा ट्रॅक्टर पकडला. ठाणेदार महादेव पडघान, पीएसआय करुणा माहुरे यांच्या मार्गदर्शनात आरोपी भगवान सिंग याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल करून त्यास अटक केली. ही कारवाई बिट जमादार राजू वानखडे, अभिजीत सिरसाट, श्रीकांत आजलसांडे, भीमराव जाधव यांनी केली. आरोपीने डिटोनेटर व जिलेटिनच्या कांड्या कशासाठी आणल्या होत्या व तो त्या कुठे नेणार होता. याची माहिती चौकशीतून समोर येणार आहे.
फोटो: ईएमएसमध्ये