अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावले असून, या निर्बंधांचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे निर्बंधांचे पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील दुकाने व व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्बंधांतून सूट मिळावी व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तसेच अन्य अधिकाऱ्यांसह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
................फोटो....................