कार्यक्रमात महामार्ग वाहतूक पोलिसांनी सर्व वाहनधारकांना एका परिपत्रकाचे वितरण करून वाहतुकीविषयी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावर अकोला, अमरावती राष्ट्रीय महामार्ग तसेच दर्यापूर, कारंजा राज्य महामार्ग येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांना थांबवून रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती देण्यात आली. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व सुखरूप प्रवास करावा, दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी प्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करावा, ट्रिपल सिट वाहन चालवू नये, याविषयीची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. १६ गोल्डन रूलचे पत्रके वाहनधारकांना देण्यात आले. सोनोरी ( मूर्तिजापूर ) येथे प्रस्तावित महामार्ग पाॅईंटवर गत दोन महिन्यांत १५५० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पोलीस अधीक्षक खेडकर नागपूर महामार्ग तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक पांडे नागपूर व पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी एपीआय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग सहा.उपनिरीक्षक राजेश अहीर, पो.काॅ.दिलीप महल्ले, संजय टेकाडे, संदीप आगरकर, शहर पोलीस स्टेशनचे मो.मोईन, वानखडे, विनोद कुमरे फिरोज यांनी परिश्रम घेतले.
३२व्या रस्ता सुरक्षा अभियानांर्तगत वाहतूक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:12 AM